लग्न हा भारतीय कुटुंबातील एक महत्त्वाचा सोहळा. अगदी गरीब माणूस असेल किंवा गर्भश्रीमंत. तो जेवढं कमावतो त्याच्या कित्येक पटींनी जास्त पैसे घरातल्या लग्नावर खर्च केले जातात.
हेच लक्षात घेत, यातल्या मार्केटसंधी शोधत भारतात लग्नाची एक भलीमोठी बाजारपेठच उभी राहिलीय.
मोठी म्हणजे किती मोठी तर अमेरिकेच्या दुप्पट मोठी. भारतातली वेडिंग इंडस्ट्री सध्या साधारण १३० अब्ज डॉलरची उलाढाल करते.
त्यामुळे आपण करत असलेलं लग्न हे आपल्या अर्थव्यवस्थेलाही काही देत असतं, हे तुम्हाला लक्षात येऊ लागलंच असेल.