Krishna Butter Ball
Krishna Butter Ball Sakal

ना चक्रीवादळ हलवू शकत... ना भूकंप... तमिळनाडूतील दगडाचं रहस्य !

Published on

भारत एक असा देश आहे, जिथे नेहमीच काहीना काही आश्‍चर्य घडत असते. असाच एक चमत्कार दक्षिण भारतातील तामिळनाडूमधील महाबलीपुरम या छोट्याशा शहरात आढळतो. "कृष्णा बटर बॉल' असं या आश्‍चर्यचं नाव आहे. होय, त्याच्या नावाप्रमाणेच ही जागाही तितकीच आश्‍चर्यकारक आहे. असे म्हणतात, की इथल्या या दगडाला ना चक्रीवादळ हलवू शकतं.. ना भूकंप...! काय आहे या कृष्णा बटर बॉल दगडाचं रहस्य? या दगडामुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक इतिहासाची चर्चा होत आहे.

गुरुत्वाकर्षणाचा परिणामच नाही

आपण बऱ्याच खडकाळ ठिकाणी मोठे दगड पाहिले असतील, परंतु इथे एक रहस्यमय दगड आहे, जो आकारात गोलाकार आणि खूप मोठा आहे. तसेच हा दगड वर्षानुवर्षे उतार असलेल्या टेकडीवर उभा आहे. यापेक्षाही आश्‍चर्य म्हणजे, या दगडाभोवती असे कोणतेही दगड नाही. तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथील कृष्णा बटर बॉल हा दगड एका डोंगरावर 45 डिग्री उतारावर असून एक - दोन नव्हे तर 1 हजार 300 वर्षांपासून हा दगड भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोड देत आहे तसा उभा आहे. झुकलेल्या अवस्थेत असलेला दगड 20 फूट उंच आणि 5 मीटर लांब आहे. या दगडाचे वजन 250 टन इतके आहे.

या दगडाकडे पाहिल्यानंतर असे वाटते की कधीही हा दगड कोसळेल. हा दगड 1 हजार 300 वर्षांपासून आहे त्या अवस्थेत आहे. या दगडावर गुरुत्वाकर्षणाचा कोणताही परिणाम होत नाही. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार देवाने हा दगड महाबलीपुरम येथे ठेवला होता. देवाला तो किती शक्तिशाली आहे हे दाखवायचे होते. त्यासाठी त्याने स्वर्गातून हा दगड येथे आणला, असे येथील लोक मानतात. भूवैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवर झालेल्या नैसर्गिक घटनांमुळे या दगडाची निर्मिती झाली असावी आणि तो असामान्य अवस्थेत उभा आहे.

खरंच श्रीकृष्णाची लोणी?

इथल्या स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे, की तो दगड नाही तर भगवान श्रीकृष्णाची लोणी आहे जी येथे स्वर्गातून पडली आहे. या कारणास्तव लोकांनी या जागेचे नाव कृष्णा बटर बॉल असे ठेवले आहे. पूर्वी हे ठिकाण निर्जन होते, परंतु आता ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. चेन्नईला येणारे पर्यटक नक्कीच हे ठिकाण बघायला येतात.

त्यामुळे दररोज देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. हिंदू लोकांच्या मते, श्री कृष्णाच्या आईने तयार केलेली लोणी कृष्णासह त्याचे सवंगडी लपून-छपून घ्यायचे. श्री कृष्णाने चोरलेली लोणी घट्ट होऊन हा दगड तयार झाल्याचे मानले जाते. कृष्णा बॉलकडे पाहिल्यानंतर असे वाटते की, तो कधी पडेल याचा अनुमान लावता येत नाही. पण गेल्या 1 हजार 300 वर्षात असे काही झाले नाही. हा दगड हटवण्यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात आले, पण त्याला कधीच यश आले नाही. हा दगड स्वर्गातून पृथ्वीवर आल्यामुळे त्याला कोणी हात लावू शकत नाही असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. लोक असेही मानतात की भगवान श्रीकृष्णाने स्वर्गात बसून लोणी खाताना त्याचा काही भाग पृथ्वीवर पडला असावा आणि नंतर तो दगड बनला असेल.

7 हत्तींची मदतही ठरली निष्फळ

असे नाही की हा दगड काढण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही. सर्वप्रथम, दक्षिण भारतात पल्लव राजवंशाच्या राजाने हा दगड काढून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्याच्या सैन्यातील बलवान लोकसुद्धा एक इंचही हा दगड हलवू शकले नाहीत. यानंतर सन 1908 मध्ये मद्रासच्या राज्यपालांना या ठिकाणी काहीतरी बांधायचे होते आणि हा दगड हटविण्याचा आदेश दिला. लोकांनी ते सहजपणे काढण्याचा प्रयत्न केला परंतु दगडाचा एक तुकडादेखील तोडू शकले नाहीत. यानंतर दगड काढण्यासाठी 7 हत्तींची मदत घेण्यात आली, पण त्याचा देखील काहीच परिणाम झाला नाही. अनेक वेळा प्रयत्न करून देखील हा दगड जागचा हलला नाही. अखेर राज्यपालांनी यापुढे हात टेकले.

तज्ज्ञ काय मानतात?

भूगर्भशास्त्रज्ञ असे सांगतात, की या दगडाच्या मागे काही रहस्य दडलेले आहे. कारण, कोणताही दगड इतकी वर्षे नैसर्गिकरीत्या एकाच ठिकाणी कोणत्याही क्षतीशिवाय राहू शकत नाही. परंतु ते त्यास देवाचा चमत्कार मानत नाहीत, म्हणून या दगडावर सतत संशोधन चालू आहे. विज्ञान इतके पुढे गेले असले तरी आतापर्यंत याचे कारण कळाले नाही की केवळ 4 फूट आधारावर हा 250 टन दगड कसा काय उभा आहे. काहींच्या मते हा दगड झुकण्याचे मुख्य कारण म्हणजे घर्षण आणि गुरुत्वाकर्षण होय. घर्षणामुळे हा दगड घसरत नाही तर गुरुत्वाकर्षणाचे केंद्र या दगडाला 4 फुटाच्या आधारावर उभा करतो.

भारत-चीन संबंधाचा सेतू

2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोन्ही नेत्यांची भेट या शहरात झाली होती. तेव्हा या दोन्ही नेत्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोत मोदी आणि जिनपिंग यांच्या मागे एक मोठा दगड दिसत आहे. इतिहासाची आवड असणारे चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना भेटण्यासाठी महाबलीपुरमची निवड करून मोदींनी दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()