अमित रेठरेकर
मोनिका हालन या प्रसिद्ध लेखिकेने सोप्या लेखनशैलीतून वैयक्तिक वित्त नियोजन आणि व्यवस्थापन अगदी दशकांपासून प्रत्येक पिढीच्या वाचकांपर्यंत पोहोचवलेले आहे.
त्यांची ही पुस्तक मालिका ‘Let’s Talk’ अर्थात ‘चला बोलूया’ अशा सूचक शीर्षक शब्दांपासून सुरू होते आणि पुढे जो-तो विषय-संदर्भ असतो. त्यांची मागील दोन पुस्तके; ‘Let’s Talk Money’ पैशांविषयी बोलू काही व ‘Let’s Talk Mutual Funds’ म्युच्युअल फंडाविषयी बोलू काही अशी होती. याच मालिकेतील त्यांचे ‘Let’s Talk Legacy’ (लेट्स टॉक लिगसी) हे पुस्तक नुकतेच एक जून २०२४ रोजी प्रकाशित झाले.
‘लेट्स टॉक लिगसी’ या पुस्तकाची रचना ‘स्वाध्याय वही’प्रमाणे केली आहे.