रणजित कुलकर्णी
आयुर्विमा क्षेत्रात पॉलिसी सरेंडर किंवा असाइन करण्याच्या मुद्द्यावरून सध्या वाद सुरू असल्याचे दिसते.
विशेषतः भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि ACESO या कंपनीमध्ये वादाच्या ठिणग्या पडताना दिसत आहेत, तसेच सर्वच विमा कंपन्यांना भेडसावणारा मुद्दा म्हणजे विमा पॉलिसीचा ‘पर्सिस्टन्सी रेशो’ हा दर पाच वर्षांनंतर सुमारे ५० टक्के इतका खाली येतो.
आयुर्विम्याच्या दीर्घकालीन स्वरूपामुळे हा पेच निर्माण होतो. एकीकडे पॉलिसीधारकाला पॉलिसी सरेंडर करून रोख रक्कम घेण्याची निकड भासू शकते, तर दुसरीकडे विमा कंपनी फक्त ३० किंवा ४० टक्केच सरेंडर मूल्य देऊ शकते.
मग या पेचावर तोडगा काय? अशा परिस्थितीत ACESO ने ALIP (Assign Your Life Insurance Policy) या योजनेद्वारे एक तोडगा आणला आहे. नक्की काय आहे ही योजना, यावर टाकलेला प्रकाश.