Life Insurance Policy: आयुर्विमा पॉलिसी सरेंडरला नवा पर्याय योग्य की अयोग्य?

New Insurance Policy Rule : आयुर्विमा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून एक जाहिरातयुद्ध बघायला मिळत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि ॲसेसो या दोन कंपन्यांमध्ये आयुर्विमा पॉलिसी असाइन करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू असल्याचे दिसते. हा प्रकार नक्की काय आहे, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.
Policy surrender decision
Policy surrender decision E sakal
Updated on

नीलेश साठे

सेसो (ACESO- याचा ग्रीक भाषेत अर्थ आहे पुनर्प्रकाश) कंपनीने एक जाहिरात दिली, की भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच ‘एलआयसी’ची पॉलिसी सरेंडर करण्याऐवजी आम्हाला ती चालवायला द्या, एलआयसी जितकी सरेंडर व्हॅल्यू देणार असेल, तितकी तर आम्ही देऊच; शिवाय तुमच्या पॉलिसीचे पुढील विमा हप्तेसुद्धा भरू; जेणेकरून तुमचे विमाछत्र अबाधित राहील.

जर काही कारणाने विमेदाराचा मृत्यू झाला तर आम्ही नॉमिनीला मृत्युदाव्यात मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कमसुद्धा देऊ.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.