भूषण ओक
दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराने मूल्याधिष्ठित गुंतवणुकीची तत्त्वे नीट समजून घेणे अत्यावश्यक आहे, तरच तो शेअर बाजारातून चांगल्या प्रमाणात स्वतःसाठी संपत्ती निर्माण करू शकेल.
ही तत्त्वे समजायला खूप सोपी आहेत; पण आचरणात आणण्यासाठी तितकीच कठीण आहेत. मूल्याधिष्ठित गुंतवणुकीच्या मूलतत्त्वांमध्ये कंपनीचे आंतरिक मूल्य आणि सध्याचे मूल्यांकन या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत.
त्यापैकी मूल्यांकन म्हणजे काय हे आपण समजून घेतले. सद्य:स्थितीतील रोज बदलत असणारे मूल्यांकन आपल्याला कंपनीच्या बाजारभावावर आधारित आकड्यांवरून मिळते; पण कंपनीचे आंतरिक मूल्य निश्चित करणे यात गणिताबरोबरच कलादेखील आहे आणि यासाठी खूप अनुभव लागतो.