रणजित (राधाकृष्णन) शिवराम हे महिंद्रा मनूलाइफ म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. कालिकत विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणेस्थित मशिन टूल्स उद्योगातील नामांकित पीएमटी मशिन टूल्स प्रा. लि.मधून कारकिर्दीस सुरुवात केली.
दोन वर्षांच्या नोकरीनंतर इंडिया बिझनेस स्कूल, हैदराबाद येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल झाले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘बिझनेस अॅनालिस्ट’ म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी पत्करली.
नंतर पीसीएस सिक्युरिटीज प्रा. लि.मध्ये ‘सेल साइड अॅनालिस्ट’ म्हणून दाखल झाले. या नोकरीत त्यांनी भारतीय कंपन्यांचा विश्लेषक म्हणून, मूल्य गुंतवणुकीचा अनुभव घेतला. बेंजामिन ग्रॅहम आणि वॉरन बफेट यांना ते आदर्श मानतात.
महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अँटिक स्टॉक ब्रोकिंग, बाटलीवाला अँड करानी सिक्युरिटीज इंडिया प्रा. लि. या कंपन्यांत अनुभव घेतला आहे. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.