Preeti Rathi-Gupta Interview: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रीती राठी-गुप्ता आणि रिद्धी कनोरिया यांनी ‘एलएक्सएमई’ हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी साह्य करणारा हा महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला एकमेव प्लॅटफॉर्म आहे.
महिलांनी आर्थिक गुंतवणुकीबाबत जागरूक व्हावे आणि आर्थिक निर्णय स्वतः घ्यावेत, त्यासाठी सक्षम करण्याचे कार्य हा प्लॅटफॉर्म करत आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे. ‘एलएक्सएमई’च्या संस्थापक प्रीती राठी-गुप्ता यांच्याशी प्राची गावस्कर यांनी साधलेला हा संवाद...