Financial Planning: ‘आर्थिक नियोजनाचे बाळकडू वडिलांकडून’

चतुरस्त्र अभिनेता अभिजित खांडकेकर सांगतोय, अभिनय क्षेत्रात काम करताना आर्थिक नियोजन का महत्त्वाचं आहे त्याबद्दल...
अभिजित खांडकेकर
अभिजित खांडकेकरई सकाळ
Updated on

अभिजित खांडकेकर, अभिनेता

अभिनय क्षेत्रामध्ये बचत करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात, सर्वजण त्याला महत्त्व देतातच असे नाही.

माझ्या बाबांकडून मला आर्थिक नियोजनाचे बाळकडू मिळाले आहे. त्यांनी एका बँकेत शाखाधिकारी म्हणून काम केले असल्याने आर्थिक नियोजन हा विषय मला लहानपणापासूनच अवगत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आपल्याला मिळालेल्या पैशातून काही हिस्सा बाजूला ठेवावा याचे धडे बाबांकडूनच मला मिळाले. मी पुण्यात शिकत असताना बाबा मला ठराविक रक्कम पाठवायचे, त्यामध्ये मला महिना काढावा लागायचा, तरीही त्यातून वाचलेले पैसे साठवून मी छोट्या-मोठ्या एफडी करत असे.

वयाच्या १६ व्या वर्षी मी थोडाफार कमावता झालो. त्यामुळे बाबांकडे पॉकेटमनी मागण्याची फारशी वेळ आली नाही. त्यामुळे जे काही खर्च करत होतो, त्यावर आपोआपच निर्बंध आले आणि मला तेव्हापासूनच बचतीची सवय लागली.

पुढेही याचाच अवलंब केल्याने ते आता माझ्या अंगवळणी पडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.