Investment:पॅसिव्ह उत्पन्नाचे महत्त्व वाढतेय...!-विराजस कुलकर्णी

passive income:अभिनय क्षेत्रातल्या अस्थिरतेमुळे आता आमच्या पिढीला ‘पॅसिव्ह’ उत्पन्नाचे महत्त्व जाणवते आहे, असं म्हणतोय, अभिनेता विराजस कुलकर्णी. त्याच्या गुंतवणुकीचे फंडे वाचूया...
विराजस कुलकर्णीचे गुंतवणुकीचे फंडे
विराजस कुलकर्णीचे गुंतवणुकीचे फंडेई सकाळ
Updated on

आमच्या पिढीला ‘पॅसिव्ह’ उत्पन्नाचे महत्त्व जाणवते आहे. मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या नाट्य, चित्रपट क्षेत्रात अतिशय अस्थिरता आहे. हे एकमेव क्षेत्र असं आहे, जिथे तुम्ही चांगले काम केले तरीही नवे चांगले किवा आपल्याला हवे तसे काम मिळेल याची शाश्वती नसते.

कारण एखादी भूमिका चांगली केली, की त्याच साच्यातल्या भूमिका समोर येतात आणि त्याच साच्यात अडकायचे की वेगळे काम मिळेपर्यंत ते नाकारायचे हे ठरवावे लागते. साच्यात अडकायचे नसेल, तर समोर आलेले साचेबद्ध काम नाकारावे लागते.

या सगळ्या प्रकारात आर्थिक प्राप्तीही करण्याची संधीही हुकते, त्यामुळे ‘पॅसिव्ह’ उत्पन्न मिळवणे गरजेचे असते. हे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग म्हणजे शेअर, कमोडिटी मार्केट, म्युच्युअल फंड अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे.

आजच्या काळात शेअर, कमोडिटी मार्केट यात गुंतवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहजसुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत. याबाबत अधिकृत माहिती देणारे तज्ज्ञ आहेत.

त्यामुळे अभ्यासपूर्वक, काळजीपूर्वक गुंतवणूक शक्य आहे. आपल्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून नियोजनपूर्वक ‘पॅसिव्ह इन्कम’ची तरतूद केली पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.