मेघा धाडे, अभिनेत्री
आपण कमाई करायला सुरुवात केल्यापासूनच पुढील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आर्थिक तरतूद करण्याचे नियोजन करणे गरजेचं आहे.
उद्या आपण अचानक बेरोजगार झालो, तर नवं काम मिळेपर्यंत आपण कोणाकडेही हात न पसरता स्वकष्टाच्या पैशावर जगू शकतो का किंवा आपल्याला एखादी नवी गोष्ट करायची असेल, म्हणजे घर बांधणं, परदेश दौरा करणं असेल किंवा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय असतील, तर अशा वेळी आपल्याला कोणापुढेही हात पसरायला लागू नयेत, यासाठी आपल्याकडं पैशाचं पाठबळ असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पैशांचं नियोजन करणे गरजेचं आहे. स्वाभिमानाने जगायचं असेल, आर्थिक नियोजनाला आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. परिस्थितीमुळे हे मी खूप लहान वयातच शिकले.