प्रीमियम आर्टिकल
‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल…’ हा मुखडा जगदीश खेबूडकरांना कसा सूचला?
पिंजरा चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण होतायत...
मनात रूतलेला ‘पिंजरा’
मराठी चित्रपटसृष्टीतील रंगीत सिनेमाचे युग रुजवलेला, तिकीटबारीवर विक्रमी गल्ला गोळा करणारा, पन्नास वर्षांनंतरही अजूनही ओठावर रेंगाळणारी गाणी असणारा, साध्या- सोप्या शब्दांमधून प्रभावी तत्वज्ञान मांडणारा आणि अभियनाची उंची गाठणारा चित्रपट म्हणजे पिंजरा होय. पुण्यात ३१ मार्च १९७२ रोजी प्रभात थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर मुंबईत तो १४ एप्रिल १९७२ रोजी प्लाझा ( दादर), भारतमाता ( लालबाग), सेन्ट्रल ( गिरगाव) येथे प्रदर्शित झाला प्रदर्शनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त चित्रपटांच्या आठवणींवर टाकलेला प्रकाशझोत....