प्रा. डॉ. डी. एन. मोरे, विद्या आणि व्यवस्थापन परिषद सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
शिक्षणातून व्यक्ती, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होतो. त्यामुळे शिक्षण हे राष्ट्राच्या विकासाचे इंजिन मानले जाते. त्यामुळेच हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाल्यानंतर पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पीपल्स कॉलेजची १९५० ला स्थापना केली. त्यानंतर विविध संस्थांनी महाविद्यालये सुरू केल्याने शिक्षणाचा विस्तार झाला. १७ सप्टेंबर १९९४ रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असून लातूर आणि परभणी येथे उपकेंद्र आहेत तर किनवट येथे उत्तमराव राठोड संशोधन केंद्र आहे. या लेखात येत्या २५ वर्षांत या चार जिल्ह्यांतील उच्च शिक्षणाचे मार्गक्रमण कसे असावे, यावर दृष्टिक्षेप टाकला आहे.