डॉ. आंबेडकरांच्या वडीलांमुळे शक्य झालं 'मायनी पक्षी अभयारण्य'
सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमा भागातील महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून 'मायणी' पक्षी अभयारण्याकडे पाहिले जाते. सातारा शहरापासून सुमारे ८५ किलोमीटरवर खटाव तालुक्यात ते आहे. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान लाखो देशी-विदेशी पक्षी वास्तव्यास येतात. त्यामुळे हे अभयारण्य पक्ष्यांसाठी ‘माहेरघर’ आहे.
ब्रिटिश राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिश शासनकर्त्यांचे लक्ष होते. या ठिकाणी राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या देखरेखीखाली , १८९० च्या दशकामध्ये येथील डोंगर कपारीवरून पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आला आहे. १९८२ मध्ये तलावाशेजारी असलेल्या वनविभागाच्या जागेमध्ये ६५ हेक्टरचे मायणी वनउद्यान वनविभागाचे क्षेत्र आहे. १९८५ मध्ये त्याचे इंदिरा गांधी राष्ट्रीय पक्षी अभयारण्य असे नामकरण करण्यात आले होते. ऐतिहासिक वारसा असलेल्या मायणी नगरीमध्ये शिवकालापासून व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध आहे, या ठिकाणी शिवकाळामध्ये मोठा घोडेबाजार भरत असलेली नोंद इतिहासामध्ये आहे.