यंदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिवसेनेच्या युवक संघटनेचा दणदणीत विजय झालाय.
युवा सेनेच्या उमेदवारांनी सर्व १० जागांवर विजय मिळवला. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंच्या सोशल मीडिया खात्यांवर नुसता रील्स,पोस्ट्स, कमेंट्सला बहर आलाय. विधानसभा, लोकसभेची निवडणुक जिंकल्यागत तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं आहे.
एवढ्या प्रतिष्ठेच्या या सिनेट निवडणुकींचं महत्त्व तरी काय आहे, या निवडणुका यंदा एवढ्या प्रतिष्ठेच्या का म्हणून झाल्या आहेत? सिनेटच्या पदवीधर मतदारसंघात निवडुन आलेल्या लोकांचं नेमकं काय काम असतं?