प्रीमियम आर्टिकल
तरुण पिढीसाठी बचतीचे हे पर्याय...
जुन्या पिढीतील लोक केवळ आपल्यापुरता विचार न करता पुढच्या पिढीसाठीही शक्य तेवढी तरतूद करण्याचा प्रयत्न करीत
बचत आणि काटकसर ही भारतीयांची पूर्वापार मानसिकता आहे. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत अशा कोणत्याही उत्पन्नस्तरातील व्यक्ती असली, तरी आपल्या ऐपतीनुसार थोडे-बहुत पैसे बचतीसाठी आवर्जून बाजूला ठेवण्याचा तिचा प्रयत्न हमखास असतो. मात्र तरुण पिढीतील अनेकांचा विचार अलीकडे वेगळा असल्याचे दिसून येते. उद्याच्या भविष्यासाठी आजच्या मौजमजेत काटछाट कशाला करायची, उद्याचे उद्या पाहू.. असे म्हणणारे युवक कमी नाहीत. खूप कष्ट करावेत, जास्तीत जास्त पैसे कमवावेत आणि खर्चाचाही जल्लोश करावा, अशी त्रिसूत्री त्यांची असते. त्यांचे हे धोरण खरेच योग्य आहे काय.. बचतीची काही गरजच नाही काय...