राष्ट्रीय परीक्षण संस्थेने (NTA) ने शुक्रवारी जाहीर केले की संयुक्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) जून २५ ते जून २७, २०२४ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
उमेदवारांनी (https://csimnet.nta.ac.in) या अधिकृत संकेतस्थळावरुन पुढील माहिती घ्यावी, असं सांगण्यात आलं. शिवाय आणखी काही प्रश्न असतील तर NTAच्या हेल्प डेस्कला 011-40759000 किंवा 011-69227700 वर संपर्क करण्यास तसेच csimet@nta.ac.in या ईमेल आयडीवर विचारण्याची संधी दिली गेली.
तरीही उमेदवार विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न राहिलेच होते. शिवाय सामान्य नागरिकांनाही हा प्रश्न पडला की असं झालंय तरी काय, प्रत्येक परीक्षेत घोळ, पेपरफुटीचा आरोप नेमकं परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेला काय झालं आहे?