Former CJI Supreme Court D Y Chandrachud Tenure
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त झाले. भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून चंद्रचूड यांनी या पदाची सूत्रे ९ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वीकारली होती. या पदासाठी त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळाला. त्यांच्या कारकिर्दीविषयी सुरुवातीला खूप आशा-अपेक्षा उंचावलेल्या होत्या. मात्र, पंतप्रधान मोदींचे त्यांच्या घरी गणेशपूजनासाठी उपस्थित राहणे आणि त्यांचे ‘अयोध्या वादावरील निकाल देण्याआधी द्विधा मनःस्थितीत असताना आपल्याला देवतेचा कौल मिळाला,’ अशा त्यांच्या कथित वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. न्याययंत्रणेचा मूलभूत उद्देश आणि सत्ताविभाजनाबाबतच्या सर्वमान्य सिद्धांताबाबतचे त्यांचे आकलन विसंगत असल्याचे याद्वारे निदर्शनास आले. त्या विषयी...