प्रीमियम आर्टिकल
भारतात अंध महिलांसाठी पहिली शाळा पंडीता रमाबाईंनी सुरु केली
दौंड तालुक्यातील केडगाव येथे १०० एकर जागेवर मुक्ती मिशनची स्थापना...
जागतिक पातळीवरील समाजसेविका पंडिता रमाबाई यांनी ५ एप्रिल १९२२ रोजी केडगाव येथील त्यांच्या कर्मभूमीत आपला देह ठेवला. अलौकीक सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण, आध्यात्म या तीन गोष्टींचा वारसा रमाबाईंनी दिला आहे. त्यांचे जीवन कार्य हे रूढी परंपरांना हादरे देणारे होते. पंडिता रमाबाई म्हटले की, ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती होऊन या धर्माचा प्रचार करणारी महिला असेच चित्र समोर येते. पण त्यांनी याहून खूप काही केले आहे. त्यांच्या आयुष्यातील कितीतरी घटना त्यांच्या विद्रोही, बंडखोर स्वभावाचे दर्शन घडवतात. १०० व्या स्मृती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा...