शाळा घरापासून लांब गेल्या आणि मुलांची शाळेत ने आण करण्यासाठी स्कूलबसची संस्कृती रुढ झाली. स्कूलबसचा हा प्रवास मुलांसाठी महत्त्वाचा असतो.
मुलंच काय पालकांसाठीही ते महत्त्वाचं असतं.
स्कूलबसमध्ये मुलांच्या गप्पाटप्पा, मजा मस्ती तर होतेच पण याच स्कूलबसमध्ये होणारं Bullying ही अनेक पालकांची चिंता आहे.
हल्ली रस्त्यावरची वाढती रहदारी, वाहतुक कोंडी यामुळे शाळेत जाण्यासाठीचा वेळ वाढला आहे. त्यामुळे अर्थातच शाळेच्या या बसेसमध्ये मुलांचा असलेला वेळही वाढलेला असतो.