Child Memory Explained In Marathiमाझी मुलगी साडेतीन-चार वर्षांची असताना आम्ही तिला जंगल सफारीला नेलं. तिथे तिला लक्षात राहिली एक घसरगुंडी!आम्ही तिला निसर्ग, प्राणी दाखवायला गेलो होतो पण तिच्या लक्षात राहिली घसरगुंडी.असं का झालं?.पण यानिमित्ताने एकदम इन्स्टावरचा एक ट्रेंड आठवला. #Corememories अनेक पालक मुलांचे फोटो, व्हिडीओ टाकून आम्ही मुलांसाठी मेमरीज म्हणजे आठवणी तयार करतोय, असं म्हणतात. आम्हीसुद्धा असंच काहीतरी करत होतो, अर्थात आम्ही फक्त फोटो काढले होते, ते पोस्ट केले नव्हते पण माझ्या मुलीच्या आठवणी प्राण्यांशी निगडीत नव्हत्याच कदाचित. तिच्या आठवणीत प्राणी नव्हे तर ती लाल-पिवळी चकचकीत घसरगुंडीच होती. .पण खरोखरच मुलांच्या स्मृती, आठवणी अशा तयार होतात का? पालक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पोस्ट करताय, त्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात का?ते खास क्षण मुलांच्या आठवणीतले क्षण होऊन राहतात का, की आपण त्यांच्या आठवणींना एकप्रकारे मॉडरेट करत असतो?मेंदू, मन आणि आठवणी यांचं हे समीकरण नेमकं आहे तरी कसं?.क्वालिटी टाईम द्यामानसोपचारतज्ज्ञ डॉ श्रुती पानसे म्हणतात, मुलांसाठी जर खरोखरच चांगल्या आठवणी तयार करायच्या असतील तर त्यांच्याशी चांगले वागा. त्यांना खरे अनुभव द्या. आभासी जगातले नव्हेत. त्यांच्यासोबत वेळ घालवा. खऱ्या अर्थाने क्वालिटी टाइम द्या..आठवणी कशा तयार होतात? How memories are Created?डॉ श्रुती पानसे म्हणतात,आपल्या मेंदुमध्ये न्युरॉन्स नावाच्या पेशी असतात. आपण जेव्हा एखादा अनुभव घेतो. तेव्हा त्या पेशी एकमेकाशी जोडल्या जातात. आपण सतत शिकत असतो. नव्या गोष्टी ऐकत असतो, पाहत असतो. त्यातून न्युरॉन्सची जोडणी होत असते. त्यातूनच आपल्या आठवणी आकाराला येत जातात.तर मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक तृप्ती कुलश्रेष्ठ म्हणतात, जेवढे अनुभव जास्त, तेवढे न्युरॉन्सचं जाळं विस्तारत जातं. हे जाळं जेवढं मोठं होत जातं म्हणजेच आठवणी तयार होत जातात. उतारवयात जेव्हा अल्झायमर होतो तेव्हा हेच जाळं विरळ होत जातं, न्युरॉन्स कट व्हायला सुरुवात होते.. .आठवणी का तयार होतात? Why are memories formed?न्युरॉन्सच्या जाळ्यांतून आठवणी विणल्या जातात हे तर आपल्याला समजलं पण आठवणी तयार होतात याचं आणखी एक कारण असतं ते म्हणजे stimulation अर्थात उद्दीपन. जेव्हा भावना तीव्र होतात, ते प्रसंग साधारण आपल्या आठवणीत राहतात. आपल्याला आनंदी आठवणी असतात तशा दु:खी आठवणीही असतात. कुणाबद्दल रागाच्या असतात, कुणाबद्दल प्रेमाच्या असतात. भीतीच्या असतात, निर्भयतेच्या असतात कारण आपण केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या प्रसंगात, अनुभवात ती भावना तीव्रपणे अनुभवलेली असते. ते उद्दीपन आपल्यासह घडलेल्या प्रसंगाना आठवणीत कैद करतं..आठवणींना वास, चव, रंग असतो का? Do memories have smell, taste, color?हो नक्कीच असतो. कारण एखादा अनुभव घेताना संबंधित मुलाने नेमकी कोणती भावना तीव्र अनुभवलेली आहे ते आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे कधीकधी आपल्याला मोठं झाल्यावर कुणा विशिष्ट व्यक्तीच्या हातखंडा पदार्थाची आठवण अगदी चवीसकट येते. एखादा गंध कायमचा लक्षात राहतो. बऱ्याचजणांना कोऱ्या पुस्तकाचा वास आठवतो. अगदी वाईट वासही आठवण होऊ शकतो. कारण तो कोणत्या ना कोणत्या अनुभवाशी आणि त्यातून मेंदु जे शिकतो त्याच्याशी निगडीत असतो. .कधी कधी आपल्याला आपल्या लहानपणच्या अगदी क्षुल्लक गोष्टी आठवतात. लक्षात राहतात. मग ते एखादं फुलझाड असू शकतं. घरातलं एखादं टेबल असतं. एखादी चादरसुद्धा असू शकते किंवा घरातला कोपरा. वरच्या केसमध्ये माझ्या मुलीलासुद्धा फक्त घसरगुंडी आवडली होती. साधी घसरगुंडी ती, असं आपण म्हणून जातो... पण तिला ती आवडली होती. असं का होतं?.कधीकधी क्षुल्लक वस्तू, गोष्टीही आठवणीत का राहतात? why trivial things remain in the memory?बालमानसोपचारतज्ज्ञ सांगतात. मुलांचं जग मोठयांच्या जगापेक्षा संपूर्णपणे वेगळं असतं. त्यांचे अनुभव वेगळे असतात. ते घेण्याची, त्यावर व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळेच त्यांना लक्षात राहिलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. म्हणूनच घरातल्या मोठ्यांना महत्त्वाची न वाटलेली एखादी गोष्टसुद्धा त्यांना महत्त्वाची वाटते. लक्षात राहते. खरंतर मुलं मोठ्यांपेक्षा अशी वेगळी असतात म्हणूनच ती अधिक cool असतात. .खरंच मुलांच्या मेंदुत साठवणुक क्षमता असते का? Do children's brains have storage capacity?हो. मुलांच्या मेंदुत उत्तम साठवणुक क्षमता असते. मुलं दरदिवशी नवनवे अनुभव घेत असतात. त्यातल्या निष्कर्षानुसार त्याचं माहितीत रुपांतर होत असतं. मात्र मोठ्यापेक्षा ती निश्चितच कमी असते कारण मुलांचं अनुभवविश्वच मोठयापेक्षा कमी असतं. तरीही जेव्हा एखाद्या अनुभवाशी भावना जोडली जाते आणि ती तीव्र असेल तर ती आठवण मुलाच्या डोक्यात म्हणजे न्युरॉन्समध्ये फिट्ट बसते. .तरीही लहानपणीचे पाढे मोठेपणी सगळे आठवत नाहीत? Why do we forget things?कारण आठवणी, स्मृती तयार होण्याचा आणखी एक निकष म्हणजे वारंवारिता. तीव्र भावनेत अनुभवलेल्या गोष्टी लक्षात राहतात त्याचप्रमाणे वारंवार केलेल्या, रोज दिसलेल्या, ऐकलेल्या गोष्टीही स्मरणात राहतात. लहानपणी जे पाढे आपण सतत घोकलेले असतात ते मोठेपणी लक्षात राहतात. पण जे तेवढ्याच पुरते पाठ केलेले असतात ते आपला मेंदु पुसून टाकतो. .मुलांसाठी अनुभव देणं का महत्त्वाचं? Why is experience important for children?मुलांना अधिक खेळणी देण्याऐवजी अधिक अनुभव द्यावेत असं अनेक डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक सांगतात. याचं कारण म्हणजे प्रत्येक अनुभव हा आपल्यासाठी एक शिकण्याची प्रक्रिया असते.तृप्ती यासाठी कुत्र्याचं उदाहरण देतात. लहान मुलाला जोवर कुत्र्याच्या अतिजवळ जाण्यातली भीती काय आहे, हे लक्षात येत नाही तोवर त्याला कितीही सांगा कुत्र्यापासून सावध राहा हे पटतंच नाही. कारण त्याची शिकण्याची आणि अनुभवाची प्रक्रिया त्यातून होत असते. .हा लेख लिहीताना मानसोपचारतज्ज्ञ, बालअभ्यासक डॉ श्रुती पानसे आणि मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक तृप्ती कुलश्रेष्ठ यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.