Passenger vehicle loan:प्रवासी वाहनकर्जाला मागणी

‘‘आर्थिक वर्ष २४ मध्ये, आम्ही महाराष्ट्रातील १८,४७८ कर्जदारांना अंदाजे ६४५कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलेले आहे, तसेच गेल्या काही महिन्यांपासून कर्जाच्या मागणीसाठी आमच्याकडे सातत्याने विचारणा होत आहे. यातून महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मोठी क्षमता दडलेली असून, तिचा वापरच झालेला नाही, हे लक्षात आले...’’ सांगत आहेत श्रीराम फायनान्स लि.चे सह-व्यवस्थापकीय संचालक जी. एम. जिलानी. खास ‘सकाळ मनी’साठी त्यांची मुलाखत.
Car loan
Car loanE sakal
Updated on
Q

वाहन कंपन्यांनी २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीचा वेग कायम राखला आहे. या भावनेचा प्रवासी वाहन (PV) कर्जांमधील वितरण आणि कर्जातील वाढीवर कसा परिणाम झाला आहे?

A

जिलानी : एक विकसनशील अर्थव्यवस्था सामान्यत: प्रवासी वाहन (PV) कर्जासह विविध कर्ज विभागांमध्ये मागणीला उत्तेजनच देते. महाराष्ट्रातील टियर दोन, तीन आणि चार श्रेणीतील शहरांमध्ये प्रवासी वाहनांच्या कर्जाला असलेली मागणी स्पष्टपणे दिसत आहे.

आर्थिक वर्ष २४ मध्ये, आम्ही वितरित केलेल्या सर्व पीव्ही कर्जांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ८.७२ टक्के इतका होता. आमच्या कर्जाचा सरासरी आकार चार लाख रुपयांदरम्यान आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये, आम्ही महाराष्ट्रातील १८,४७८ कर्जदारांना अंदाजे ६४५कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलेले आहे.

तसेच, गेल्या काही महिन्यांपासून कर्जाच्या मागणीसाठी आमच्याकडे सातत्याने विचारणा होत आहे. यातून महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मोठी क्षमता दडलेली असून, तिचा वापरच झालेला नाही, हे लक्षात आले.

ग्राहकवर्गाला प्रवासी व्यावसायिक वाहने आणि खासगी मोटारी पुरवण्यावर आमचे धोरणात्मक लक्ष केंद्रीत झालेले आहे. या विभागात मजबूत मागणी आणि व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.