अनिरुद्ध राठी:
येत्या ३१ मार्च २०२४ रोजी आर्थिक वर्ष २०२३-२४ हे संपत असल्याने आता आपल्या हातात या आर्थिक वर्षाचे मोजून अवघे काहीच दिवस आहेत. नवी करप्रणाली ही ‘डीफॉल्ट’ करप्रणाली मानली जाईल. तथापि, करदात्याला जुनी करप्रणाली निवडण्याचा पर्याय कायम राहील.
अर्थात, अजूनही करदात्याला जुनी करप्रणाली निवडावी की नवी करप्रणाली, याचा पर्याय उपलब्ध आहे. जुनी करप्रणाली निवडणाऱ्या आणि त्या अंतर्गत आपले विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कलमांतर्गत करबचत योजना आणि गुंतवणुकीचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.