प्रीमियम अर्थ
बॅंक फ्रॉडपासून राहा सावध, थोडक्यात पण कामाचं!
देशभरात बॅंकाशी संबंधित फसवणूक आणि फिशिंग इमेल सतत वाढत आहेत.
Summary
देशभरात बॅंकाशी संबंधित फसवणूक आणि फिशिंग इमेल सतत वाढत आहेत.
ओटीपी पिन, सीव्हीव्ही शेअर करु नका. अनोळख्या लिंकवर क्लिक करु नका. मोबाइलमध्ये बॅकिंग संदर्भातील माहिती सेव्ह करु नका. वेब ब्राउजिंग करताना ऑटोफिल ऑप्शनमध्ये सीव्हीव्ही, एक्सपायरी डेट, कार्ड नंबर, अकाउंट नंबर ही माहिती काळजीपूर्वक भरा. एवढीच काय ती ऐकीव माहिती आहे. परंतु, तरीही सायबर चोरटे सोशल मीडिया हॅक करतात. बॅंकेतून रक्कम गायब होते. नातेवाईक व मित्रमंडळींची खाते हॅक झाले की, पैशाची मागणी होते. यावर सायबर विभागही काही करु शकत नाही. परंतु, आपणास ही माहिती असेल तर निश्चितच तुम्ही स्वत:चा पैसा बॅंकामध्ये सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी हे तुम्हाला माहितच असायला हवं.