Papad Making Business: तुम्ही तुमच्या घरूनच सुरू करू शकता. हा गृहउद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवल आणि पैसा लागणार नाही. सोबतच या उद्योगाच्या उभारणीसाठी तुम्हाला सरकारकडून कमी व्याज दराने कर्ज सुद्धा मिळणार आहे.जर तुम्ही एखाद्या घरगुती गृह उद्योग करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखातून एक भन्नाट बिजनेस आयडिया सांगणार आहोत. हि बिजनेस आयडिया तुम्ही जर का प्रत्यक्षात आणली तर तुम्ही दोन चार लोकांच्या हाताला काम तर देऊच शकाल सोबतच तुम्ही देखील उत्तम कमाई या उद्योगामधून करू शकाल.
आजच्या लेखात आपण पापड गृह उद्योगाविषयी माहिती पाहणार आहोत. हा उद्योग तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. या उद्योगासाठी तुम्हाला अतिरिक्त भांडवलांची गुंतवणूक करण्याची अजिबात गरज नाही आहे.आणि त्याहुनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उद्योगाच्या उभारणीसाठी तुम्हाला सरकारकडून काही आर्थिकदृष्ट्या मदत देखील मिळणार आहे.
पापड ची मूळ रचना हे इतर धान्याच्या पिठापासून बनवलेल्या रोटी पेक्षा नेहमी वेगळी असते यात काही शंका नाही. साधारणपणे पापड हे सर्व प्रकारे घरांमध्ये वापरले जाते. परंतु हॉटेल्स धाबे रेस्टॉरंट या ठिकाणी पापडाचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जेव्हा मित्रांनो पापड बनवण्याचे काम एखाद्या उद्योजकांकडून व्यवसायिक रित्या केले जाते तेव्हा त्याला पापड बनवण्याचा व्यवसाय देखील म्हटले जाते.
पापड हे भारतातील प्रत्येक अन्नामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असते. पापडाचे भारत देशांमध्ये प्रामुख्याने दोन भाग पडत असतात त्यामध्ये उत्तर भारतीय पापड तसेच दक्षिण भारतीय पापड असे दोन भाग पडले जातात. हे पापड भारत देशांमध्ये विविध बाजारांमध्ये विविध आकारात तसेच नावाने विकले जाते त्यामध्ये मिनी पापड, मोठे पापड तसेच भाजलेले पापड त्यांनी प्रकारे बाजारांमध्ये विकले जाते.आपल्या भारत देशामध्ये पापड ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
पापड ही अशी गोष्ट आहे की ती जवळ जवळ प्रत्येक घरांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. तसेच पापड हे सणांमध्ये लग्नामध्ये आणि इतर असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये याचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. लोकांना जेवणानंतर अन्न बरोबर पापड खाणे नेहमी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असते.
पापड उद्योगाची सुरूवात कशी करावी?
Papad Making Business सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 250 - 300 फुट जागेची गरज पडणार आहे. इतक्या जागेवर तुम्ही पापड तयार करण्याचे एक युनिट तयार करू शकता. या युनिटमध्ये तुम्हाला 2 स्किल्ड कर्मचारी, 3 अनस्किल्ड कर्मचारी आणि 1 सुपरवाइजर याची गरज लागणार आहे. हा उद्योग सुरू होताच तुमची कमाई सुरू होते. तुम्ही तयार करत असलेल्या पापडांची क्वॉलिटी आणि चव जर लोकांना आवडली तर याची आपोआपच डिमांड वाढू शकते. या उद्योगात तुम्ही बटाटा पापड, दाळीचे पापड, तांदूळाचे पापड तयार करू शकता कारण सध्या बाजारात या पापडांची जास्त मागणी आहे.
उद्योग उभा करण्यासाठी किती खर्च येतो?
या उद्योगाच्या 30,000 किलो की प्रोडक्शन क्षमता असलेले युनिट तयार करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 6 लाखाची गुंतवणूक करावी लागेल. ज्यात 4 लाख रुपयाचे कर्ज हे सरकारकडून तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे उरलेल्या फक्त 2 लाख रूपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागणार आहे.6 लाखांमध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल दोन्ही समाविष्ट असणार आहे. यात उद्योगासाठी लागणाऱ्या 2 मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे निश्चित भांडवलामधून खर्च केली जातील. दुसरीकडे, कर्मचार्यांचे 3 महिन्यांचे पगार, 3 महिन्यांसाठी कच्चा माल आणि उपयुक्तता उत्पादने खेळत्या भांडवलामध्ये खर्च केली जातील. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश आहे.
आजच्या घडीला केंद्र सरकार असंख्य नवीन उद्योग सुरू करण्यासाठी स्वस्तात कर्ज देत आहे. या व्यवसायातही तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज मिळू शकेल. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला स्वस्त दरात 4 लाख रुपयांचे कर्ज मिळते. या कर्जाच्या मदतीने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. एकदा तुम्ही कमाई सुरू केल्यानंतर तुम्ही कर्जाचा EMI देखील भरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.