मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेली १९ वर्षांची मुलगी पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकत आहे. अचानक एक दिवस तिला एक मेसेज येतो.. तू छान दिसतेस, मी तुला रोज पाहतो.. तिला कळत नाही. ती शांत आहते. परत दुसऱ्या दिवशी तसाच मेसेज आज तू लाल ड्रेस मध्ये छान दिसत होतीस. तू कुठे राहते?
असे मेसेज रोज आल्याने ती मुलगी घाबरली होती. कोणीतरी आपल्यावर सतत लक्ष ठेवत आहे असे तिला वाटू लागले. तिला रात्री झोप येईना, कोणाला सांगू कळेना, यामुळे आपली बदनामी होईल, शिक्षण बंद होईल.. लोक मलाच नावं ठेवतील... असे अनेक विचार आले तिच्या मनात... हा सायबर बुलिंगचा प्रकार होता.
नंतर लक्षात आले की त्यांच्याच कॉलेजमधील तो मुलगा होता आणि तो तिच्यासह दहा जणींना असेच मेसेज करत होता.. आणि गम्मत म्हणून..! यामध्ये अश्लील मेसेज नव्हते पण चिडवणं, त्रास देणं होतं.