प्रीमियम अर्थ
स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी करा कागदपत्रांचे नियोजन
वेगवेगळी कागदपत्रे आपल्याला वेळोवेळी लागत असतात. मात्र, बऱ्याचदा नेमकी हवी असलेली कागदपत्रे आपल्याला वेळेत सापडत नाहीत. काहीवेळा ती गहाळही झालेली असतात किंवा फाटल्याने अथवा भिजल्याने निरुपयोगी झाल्याचे लक्षात येते. अशा वेळी नव्याने ही कागदपत्रे मिळविणे वेळखाऊ, खर्चिक तसेच तापदायक होते
सुधाकर कुलकर्णी
(लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर-सीएफपी आहेत.)
sbkulkarni.pune@gmail.com
आपण विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करीत असतो. काहीजणांचे अशा व्यवहारांचे प्रमाण अधिक असते, तर काहींचे कमी असते. मात्र, अशा व्यवहारांची कागदपत्रे योग्य पद्धतीने जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. गरजेच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे सहजगत्या उपलब्ध होतील, अशा रीतीने ठेवणे आवश्यक आहे. त्याचे काय महत्त्व आहे. याविषयी मार्गदर्शन...