Financial Freedom महिलांना का हवे कुटुंबाच्या गुंतवणुकींचे आणि आर्थिक व्यवहारांचे ज्ञान?
आजकाल महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा मागे नाहीत, असे अभिमानाने सांगितले जाते. अर्थात, ते खरेच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहेच. मात्र, आर्थिक गुंतवणुकीबाबत Investments महिला आजही एक पाऊल मागे असल्याचे जाणवते. या क्षेत्रातही महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. Financial Literacy amongst the women Money Tips in Marathi
आर्थिक विषयांवर महिलांशी Women बोलताना अनेकदा ऐकू येते... ‘मी कधीच बँकेत जात नाही. आमचे ‘हे’ सगळं बघायचे’; ‘नक्की कोणकोणत्या बँकेत Bank खाती आहेत, कुठेकुठे गुंतवणूक Investment केली आहे, हे पण मला माहीत नाही, माझा नवरा ते सर्व सांभाळतो,’ ‘तिथे बायकांचे काय काम?’
दुसरीकडे काही पुरुषांचीही तक्रार असते, की त्यांच्या घरातील महिला आर्थिक व्यवहारांत Financial Matters लक्षच घालत नाहीत. आर्थिक गोष्टी सांभाळण्यात महिला इतक्या उदासीन का असतात? अनेकदा असे दिसून येते, की एखाद्या घरातील पुरुष व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या कुटुंबातील महिलांची आर्थिक बाबतीत कुचंबणा होते. संबंधित पुरुषाच्या व्यवहारांबद्दल, गुंतवणुकींबद्दल, मालमत्तांबद्दल या महिलांना काहीच माहिती नसते.