- सुधाकर कुलकर्णी
Financial Literacy in Women : जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिलांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चा होताना दिसून येते. मात्र, महिलांच्या अर्थसाक्षरतेबाबत चर्चा होत असल्याचे अभावानेच दिसून येते. आज आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण सुमारे ८० टक्के इतके आहे. असे असले तरी अर्थसाक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. ह्युमन वेल्फेअर कौन्सिलच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील महिलांच्या अर्थसाक्षरतेचे प्रमाण जेमतेम २० टक्के इतकेच आहे, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ३० टक्के इतके आहे.