(Changing Lifestyle in India and its effect on Rural and urban spending Marathi Article)
लेखक : युगांक गोयल, कीर्ती भार्गव,
सहयोगी प्राध्यापक, ‘फ्लेम’ विद्यापीठ
हे सर्वेक्षण आठ हजार ७२३ गावांत आणि सहा हजार ११५ शहरी विभागांत घेण्यात आले. या दोन्ही भागांतील एकूण दोन लाख ६० हजारांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील ही कुटुंबे वस्तू आणि सेवांवरील आपल्या खर्चाचे नियोजन कसे करतात याचे तपशीलवार चित्र या सर्वेक्षणाद्वारे मिळाले.
विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील सामाजिक आर्थिक गटांतील मासिक दरडोई उपभोग विनियोगाचा (एमपीसीई) अंदाज येण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. भारतीय नागरिक कशावर नेमका आर्थिक विनियोग करत आहे, याची सर्वांगीण माहिती या आकडेवारीवरून मिळत असल्याने ही माहिती सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या उपभोग पद्धतींचा हे एक प्रभावी मानक आहे.