जगातील ‘टॉप टेन’ अर्थव्यवस्थेत भारत पहिल्या पाचमध्ये तर ‘टॉपटेन’ राज्यांमध्ये राज्यांच्या यादीत महाराष्ट्र या स्थानावर

‘आता देवा कडून’ देशाकडे व ‘रामा’ कडून ‘राष्ट्रा’कडे आपल्याला जायेच आहे...
Indian Economy and ram mandir
Indian Economy and ram mandir esakal
Updated on

अतुल सुळे


२२ जानेवारी २०२४ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल कारण ५ शतकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर देशवासीयांचे लाडके रामलला समारंभपूर्वक, विधीवत आपल्या जन्मभूमी आयोध्येत देश-विदेशातील भारतीय भक्ती भावपूर्वक मोठ्या उत्साहाने, मोठ्या संख्येने सहभादी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला भाविकांना तसेच देश विदेशातील पर्यटकांना आयोध्येतील श्री रामललाच्या दर्शनाला येता यावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक शहर आयोध्येचा कायापालट करण्यचे काम खूप उत्साहात व नियोजनपूर्वक चालू होते.

रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळ यांचे आधुनिकीकरण करण्यात कार्यरत होणार आहे. पुढील १० वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे.

दरवर्षी सुमारे ५ कोटी पर्यटक राममंदिराला भेट देतील असा अंदाज आहे.

फोर्वज मासिकाने भारताला जगातील ७ क्रमांकाचा ‘सुदर देश’ असे म्हटले आहे जगातील ४२ ‘वर्ल्ड हेरिटेज साईटस’ भारतात आहेत.

त्यामुळे परदेशी पर्यटकांचा ओघ आपल्या देशाकडे सतत वाढतच जाणार आहे. जी-२० गटाचे अध्यक्षपद आपल्याकडे आहे.

त्या निमित्त भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांना देशाच्या नैसर्गिक, सांस्कृतिक, समृद्ध वारशाचे दर्शन घडविण्यात आले.

राममंदिरा सारखीच देशातील इतर मंदिरे सुद्धा स्वच्छ, सुंदर व भव्य करण्याचा सरकारचा मानस आहे. व त्यासाठी ‘प्रसाद’ (पिलग्रिमेज रिजुव्हनेशन ॲड स्पिरीच्युअल हेरिटेज ऑगमेटेशन ड्राईव्ह) ही योजना आखण्यात आली आहे.

आता आपण जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान भारताच्या अर्थव्यवस्थेत ज्या राज्यात राममंदिर आहे.

त्या उत्तरप्रदेशाचे स्थान नीट समजून घेऊया जेणेकरून आपल्याला राममंदिराचे ‘अर्थकारण’ नीट लक्षात येईल आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गेल्या १० वर्षांत आपण जागतिक क्रमवारीत जिडीपीच्या संदर्भात १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर उडी मारली आहे.

सोबतचा तक्त्या... पहा
जगातील ‘टॉप टेन’ अर्थव्यवस्था
क्रमांक देश जीडीपी (अब्ज डॉलर्स्)
१ अमेरिका २६९५४
२ चीन १७७८६
३ जर्मनी ४४३०
४ जपान ४२३१
५ भारत ३७३०
६ इंग्लंड ३३३२
७ फ्रान्स ३०५२
८ इटली २१९०
९ ब्राझिल २१३२
१० कॅनडा २१२२


वरील तक्त्याचे बारकाईने निरक्षण केल्यास असे लक्षात येईल की जर्मनी जपान व आपल्यात फार अंतर नाही सन २०२८ पर्यंत आपला जीडीपी ५ ट्रिलीयन डॉलर्स झाल्यास आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो.

धार्मिक पर्यटनाला पायाभूत सुविधा सुधारून चालना दिल्यास इतर अनेक उद्योगांना सुद्धा चालना मिळेल. व त्यामुळे रोजगार निर्मिती व विकासाला सुद्धा जोरदार चालना मिळेल.


आता आपण देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्तरप्रदेश या राज्याचे महत्त्व जाणून घेऊया स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘इकोनॉमिक रिचर्स डिपार्टमेंट’ने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात खालील तक्ता दिला आहे.

देशातील ‘टॉपटेन’ राज्ये -२०२८चा जीडीपी
क्रमांक राज्य जीडीपी अंदाज हिस्ता

अब्जडॉलर्स %
१ महाराष्ट्र ६४७ १३
२ उत्तरप्रदेश ५१५ १०
३ तमिळनाडू ४२६ ८
४ कर्नाटका ३९५ ८
५ गुजरात ३८६ ७
६ राजस्थान २५२ ५
७ आंध्रप्रदेश २४३ ५
८ तेलंगणा २३९ ५
९ मध्यप्रदेश २३२ ५
१० केरला २१८ ४


वरील तक्त्यावरून लक्षात येईल की सन २०२८ पर्यंत उत्तरप्रदेशाचा जीडीपी ५१५ अब्ज डॉलर्स पर्यंत गेलेला असेल व देशाच्या जीडीपीत उत्तरप्रदेशाचा हिस्सा १९ % झालेला असेल असा अंदाज आहे.

सन २०२२ मध्ये सुमारे ३२ कोटी पर्यटकांनी उत्तरप्रदेशाला भेट दिली व सुमारे २ लाख कोटी रुपये खर्च केले. सन २०२४ मध्ये पर्यटक रू ४ लाखकोटी खर्च करतील असा अंदाज आहे.

केवळ राममंदिरामुळे त्या राज्याला २० ते २५००० कोटी रुपयांचे जास्तीचे उत्पन्न मिळणार आहे. २०,००० जणांना काम मिळणार आहे. राममंदिराचे गणित! उत्तरप्रदेशाचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय देश ७-८% जीडीपी वाढीचा दर टिकवून ठेवू शकत नाही.


ता कोठकोठल्या उद्योगातील कोणकोणत्या प्रमुख कंपन्यांवर ‘रामकृपा’ होण्याची शक्यता आहे ते थोडक्यात बघुया

Indian Economy and ram mandir
SIP : नवीन वर्षात गुंतवणूक करू इच्छिता?

प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यापैकी इंडिगो, स्पाइसजेट या कंपन्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. १० लाख पर्यटक विमान प्रवास करतील असा अंदाज आहे. २०२५ साली आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्येत पूर्ण झाल्यावर परदेशी पर्यटकांची संघ्या कीतीतरी पटीने वाढेल.

आलेल्या पर्यटकांची उतरायची व्यवस्था करणाऱ्या प्रवेग इंडिय हॉटेल्स (ताज) इस्ट इंडिया हॉटेल आयटीसी (हॉटेल्स) या कंपन्याना लाभ होऊ शकतो तसेच ब्रिटानिया, गोदरेज कन्झ्युमर आयटीसी हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या ‘एफएमसीजी’ कपन्या आणि ज्युबिलंट देवायानी इंटरनॅशनल सॅफायर फुटस सारख्या ‘फास्ट फुड’ कंपन्यांना सुद्धा राम मंदिराचा लाभ होऊ शकतो लार्सन अँड टुब्रो सारख्या बांधकाम क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना सिमेंट, स्टील उद्योगांना सुद्धा चालना मिळेल.

अयोध्येकडू येणाऱ्या २०० ट्रेन्स सुरू होणार असल्याने ‘आयआरसिटीसी थॉमस कुक इझिट्रिप प्लॅनर्स अशा पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायाची वृद्धी होऊ शकतेय


वरील सूचीबद्ध कंपन्याव्यतिरिक्त पूजा साहीत्य विकणारे, माळी रिक्षावाले गाईड धोबावाले अशा छोय् व्यवसायिकांचीसुद्धा भरभराट होऊ शकते अयोध्ये बरोबरच आजूबाजूच्या ळकनऊ, कानपूर, गोरखपूर या शहरांच्या विकासाला चालना मिळेल.


अशाप्रकारे अयोध्येतील राममंदिर आपला सांस्कृतीक वारसा तर जपेलच शिवाय उत्तरप्रदेशाच्या आणि देशाच्या विकासाला जोरदार चालना देऊन सन २०४७ पर्यंत आपला देश एक प्रगत राष्ट्र झालेले असेल अशी प्रभु रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना व त्यासाठी आपण सर्व भारतीय प्रयत्न करू या प्राणप्रतीष्ठा पूर्ण झाल्यावर पंतप्रधानांनी एक महत्त्वाचा संदेश दिला.

‘आता देवा कडून’ देशाकडे व ‘रामा’ कडून ‘राष्ट्रा’कडे आपल्याला जायेच आहे. हा संदेश सर्वभारतीयांनी आचरणात आणला तरच आपली ‘रामराज्या’कडे वाटचाल होऊ शकते.
--------------------

Indian Economy and ram mandir
Maharashtra Budget Session 2024: कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक; गोळीबार अन् गुंडगिरीविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.