नेहा लिमये
Investment Mantra: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घराघरातल्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसूत्रांद्वारे आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य लाभायला हवे. ही अर्थसूत्रे रोजच्या जगण्याचा भाग झाली तर सगळे आर्थिक प्रश्न सुटतील, असे मुळीच नाही; परंतु आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या चांगल्या सवयी, शिस्त आणि ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मात्र जरूर देतील. तेव्हा ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हा मंत्र जपला, की निम्मे काम तिथेच फत्ते झाले म्हणून समजा.