प्रीमियम अर्थ
‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने अलीकडेच ६१ हजार अंशांची विक्रमी पातळी गाठली. एका बाजूला ही आनंदाची बातमी असली तरी सध्या गुंतवणूकदारांत भीतीचे किंवा काळजीचे वातावरण पण दिसत आहे
सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते, की वयाच्या साठीनंतरच्या आयुष्यात माणसाने सावध दृष्टीकोन बाळगावा. पण हीच संकल्पना शेअर बाजार निर्देशांकाला लागू ठरते का? आपल्याला यावरच विचार करायचा असून, या लेखाच्या अखेरीस अनुमानात्मक कृती निश्चित करायची आहे. त्यासाठी आपण शेअर बाजाराचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यातूनच एकसष्टीनंतरची ‘सेन्सेक्स’ची वाटचाल कशी राहील, हे समजू शकेल.