प्रीमियम अर्थ
'बिग बुल' राकेश...आणि त्यांच्या यशाचे गमक...
राकेश झुनझुनवाला यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय निडर, बिनधास्त वृत्तीचे होते. ते मार्केटला ‘बॉस’ समजायचे. चुका करायला कधीच घाबरायचे नाहीत; पण केलेल्या, झालेल्या चुकांतून धडे शिकणे ते महत्त्वाचे मानायचे. शेअर बाजारत त्यांचे असंख्य चाहते होते, जे त्यांच्या प्रत्येक खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवून असायचे.
अतुल सुळे
atulsule18@gmail.com
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
‘भारताचे वॉरन बफे’ अशी ओळख असलेले अब्जाधीश राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच निधन झाले. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधीची कमाई केली. दीर्घकाळ गुंतवणूक करण्यावर भर देणारे राकेश झुनझुनवाला यांनी शेअरमधील गुंतवणुकीबाबत नेहमीच योग्य सल्ले दिले. या प्रभावशाली व्यक्तिमत्वाविषयी...