Health Insurance ..तर मिळणार नाही विम्याची रक्कम!
Health Insurance ..तर मिळणार नाही विम्याची रक्कम!Esakal

Health Insurance ..तर मिळणार नाही विम्याची रक्कम!

आरोग्य विम्याच्या Health Insurance गुंतागुंतीकडे लक्ष देणे आणि दावा नाकारला जाण्याचे टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, पॉलिसीधारक दावा नाकारला जाण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करू शकतात
Published on

सनथ कुमार

आरोग्य विमा हा आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. वैद्यकीय गरजेच्या वेळी त्यामुळे आर्थिक संरक्षण मिळते. तथापि, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या जटिलतेमुळे अनेकदा दावा नाकारला जाऊ शकतो आणि पॉलिसीधारककठीण परिस्थितीत अडकू शकतात.

समज आणि जागरुकता वाढवण्यासाठी, आम्ही दावा Health Insurance नाकारण्याची प्रमुख कारणे आणि तुम्ही त्यांना कसे टाळू शकाल याची माहिती देत आहे. Know How to Avoid Health Insurance Claim Rejection

१. आधीपासून असलेल्या रोगांची माहिती जाहीर न करणे: दावा Insurance Claim नाकारण्याचे प्रमुख कारण म्हणजे आधीपासून असलेल्या रोगांची परिस्थिती उघड करण्यात आलेले अपयश. जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि योग्य कव्हरेज देण्यासाठी विमाकर्ते पॉलिसीच्या Insurance Policy प्रारंभीच ही माहिती सांगण्याची विनंती करतात.

अशा गोष्टी लपवून ठेवल्या तर दावा नाकारला जाऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये तर पॉलिसी संपुष्टात येऊ शकते.

२. कायमस्वरूपी वगळणे आणि अनिवार्य प्रतीक्षा कालावधी: प्रत्येक पॉलिसी विशिष्ट रोगांसाठी अनिवार्य प्रतीक्षा कालावधीसह येते. हा काळ १ ते ४ वर्षांपर्यंतचा असतो. जुनाट किडनी विकार, पार्किन्सन्स, अल्झायमर आणि एचआयव्ही यांसारखे काही आजार कायमचे वगळलेले आहेत.

Loading content, please wait...