प्रीमियम अर्थ
Digital Payment चोरट्यांना मिळालंय नवं क्षेत्र! पण तुम्ही नका फसू यात!
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने Finance Ministry केलेल्या एका पाहणी अहवालाप्रमाणे २०२२-२३ या वर्षात एकूण झालेल्या सायबर गुन्ह्यांपैकी ४७ टक्के गुन्हे हे कार्ड, बँकिंग आणि यूपीआय, जीपे, पेटीएम, भीम Digital Payment या माध्यमातून झाले आहेत
शिरीष देशपांडे
कोरोना महासाथीच्या काळात वरदान ठरलेले डिजिटल पेमेंट माध्यम सध्या खूप वापरले जाते आणि रोख पैशाचे बरेच व्यवहार आता यूपीआय, जीपे, पेटीएम,भीम या माध्यमातून होत आहेत. अनेक किरकोळ व्यवहारात रोख पैसे खिशात नसतील तरी या माध्यमातून पैसे Money देता आणि घेता येतात.
मात्र, या वाढत्या वापरामुळे सर्वसामान्यांना लुबाडण्यासाठी चौरट्यांना Thieves हा मोठा मार्ग मिळाला आहे. यापासून काळजी घेणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे; तरच आपण सर्व जण वाचू शकतात. (Know how to keep yourself safe from digital Payment Thefts)