Money Matters सर्व जग एवढे व्यवहारी झाले आहे, की पैसे मिळविल्याशिवाय त्याला काही सुचत नाही व पैशाने विकत घेता येणारे सर्व मिळविले, की त्यांचे मन आनंदित होते व ते सुखी झाले आहेत, असा त्यांचा ग्रह होतो. तथापि, येनकेन प्रकारेण पैसे मिळविणे Money Making हे जरी आजच्या भौतिक जगात अतिशय महत्त्वाचे असले तरी त्यासाठी लाचार होणे नक्कीच समर्थनीय नाही. सर्व सुख केवळ पैशाने Money मिळत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. Know who is really rich in this world only money will not give happiness in life
या जगात जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो, आपल्या वागण्याने दुसऱ्याचे चेहऱ्यावर समाधान आणतो, स्वतःची स्वप्ने बाजूला ठेऊन दुसऱ्याच्या स्वप्नांचा Dreams विचार करतो व ती पूर्ण होण्यासाठी स्वतः प्रयत्न करतो, त्याला श्रीमंत Rich म्हणावे. ज्याला दुसऱ्याचे दुःख कळते, स्वतःचे दुःख किरकोळ वाटते, ज्याला स्वतःच्या सुखाची काळजी कमी; पण दुसऱ्याच्या सुखाची चिंता जास्त वाटते, ज्याच्या मनात दुसऱ्याविषयी चांगले विचार येतात, दुसऱ्याचे भले झाल्याने मनात आनंदाच्या Happiness लहरी उमटतात, तो खरा श्रीमंत.