कोलार - भारताची सूवर्णभूमी
कोलार - भारताची सूवर्णभूमी- Esakal

Gold Rush: कुठे आहे भारतातले 'लिटल इंग्लंड'..?

कर्नाटकची राजधानी बंगळूर येथून शंभर किलोमीटर अंतरावर असलेले कोलार गोल्ड फिल्ड्सबाबत जगाला नेहमीच उत्सुकता राहिली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपासून या ठिकाणी सोने काढले जात असल्याचे इतिहास तज्ज्ञ सांगतात
Published on

स्पर्धात्मक परीक्षेत नेहमीच विचारला जाणारा प्रश्‍न. भारतात सोने कोठे सापडते ? किंवा भारतात ‘लिटल इंग्लंड’ कोठे आहे? हे ठिकाण दुसरे तिसरे नसून कर्नाटकातील ‘कोलार’ आहे. सोन्याच्या खाणीसाठी जगभरात कोलारची कीर्ती पसरली असून तेथून आतापर्यंत तब्बल ९०० टन सोने काढल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊ या 'लिटल इंग्लंड' विषयी....

एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या कोलारची आता बकाल अवस्था झाली आहे. रेल्वे किंवा रस्ते मार्गातून कोलार शहर ओलांडतो. तेव्हा आपल्याला सोन्याच्या खाणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जीव धोक्यात घालून कामगारांनी सोने शोधून श्रीमंतांना आणखी श्रीमंत केले. याच कामगारांवर पुढे उपासमारीची वेळ आली. ते आता ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत आहेत. (Little England Story of Indias biggest gold field)

दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ’वरून कोलार गोल्ड फिल्ड (Gold Field) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गोल्ड फिल्डसला २००० वर्षापेक्षा अधिक इतिहास आहे. अर्थात इंग्रजांच्या राजवटीत केजीएफचे नाव सर्वत्र पोचले. विशेष म्हणजे केजीएफ चित्रपटातील काही दृश्‍य आणि कथानक हे सत्य घटनेवर आधारित आहे. या खाणीचा (Mine) इतिहास पाहिल्यास प्रत्यक्षातील केजीएफचा इतिहास देखील रक्तरंजित आहे. इतिहासतज्ज्ञांच्या मते, चोल साम्राज्यातील लोक कोलारच्या जमिनीत हात घालून सोने (Gold) काढून घेत होते. गेल्या शंभर ते दीडशे वर्षात तब्बल ९०० टन सोने काढल्याचे सांगितले जाते.

कोलार - भारताची सूवर्णभूमी
प्रत्येक व्यक्ती एक कथा असते ती ऐकायला तुम्हाला आवडेल का? वाचा ह्युमन लायब्ररीबद्दल
Loading content, please wait...