वयाच्या २३ व्या वर्षी कर्ज? भारतातील तरुणाईच्या आर्थिक सवयी ही चिंतेची बाब आहे का?

young people taking loan
young people taking loan esakal
Updated on

भारतातील कर्जदारांचं वय घटतंय... तिशीनंतर कर्ज घ्यायचं ही मानसिकता आता बदलत असून सरासरी वयाच्या २३ व्या वर्षीच कर्ज घेतल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतात कर्जदारांची थकबाकी ही एकूण कर्जाच्या तब्बल ३२ टक्के आहे, असे दुसरं तिसरं कोणी नाही तर भारतीय रिजर्व बँकेचा डेटा सांगतोय. भारतातील तरुणाईची ही मानसिकता देशासाठी चिंतेची बाब आहे का?

२३ व्या वर्षीपासून कर्ज घ्यायला सुरुवात

कर्ज देणाऱ्या एका कंपनीने दिलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे की, जी लोकं नव्वदीच्या पुढच्या दशकात जन्मली आहेत त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षीपासून कर्ज घ्यायला सुरुवात केली होती. २० ते ३० वर्षाच्या वयात कर्ज घेणाऱ्याची संख्या ही तब्बल ३७ मिलियन (३ कोटी ७० लाख) इतकी होती. त्यातील २२ टक्के तरुणांनी पहिल्यांदा वैयक्तिक कर्ज घेतलेलं होतं. तर वयाची पंचविशी ओलांडायच्या आत २४ टक्के तरुणांनी क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली होती.

याच्याविरुद्ध जी लोकं ऐंशीच्या दशकात जन्मली त्यांनी वयाच्या २८ व्या वर्षी कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. तर ७० च्या दशकात जन्मलेल्या लोकांनी वयाच्या ३८ व्या वर्षी कर्ज घेण्यास सुरुवात केली.

एकुणातच या कंपनीच्या डेटाचा अभ्यास करता कर्ज घेण्याचे वय हे दिवसेंदिवस अलीकडे येताना दिवसतंय. आधीच्या पिढीच्या तुलनेत प्रत्येक दहा वर्षात तरुण पिढी लवकर कर्ज घेताना पाहायला मिळत आहे.

अभिमन्यूच्या चक्रव्यूहात तरुणाई फसते?

अर्थतज्ज्ञ आनंद पोफळे सांगतात, "अमेरिकेत काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड होता, की सगळं काही क्रेडिट कार्ड आणि कर्जावर. ते असा विचार करायचे की आता नाही खर्च करायचा तर कधी? साठविण्याकडे त्यांचा काही कल नव्हताच.. तोच ट्रेंड आता भारतात येताना दिसतोय."

कर्जदार अधिकाधिक तरुण होतोय ही बाब वरकरणी चांगली वाटू शकते . पण ते कर्ज फेडायची त्यांची क्षमता आहे का असा प्रश्न मला यानिमित्ताने पडतो आहे. हल्ली विशीतल्या तरुणांकडे देखील क्रेडिट कार्ड असते. पण हा ट्रॅप आहे, ज्यात हळूहळू आजची तरुण पिढी फसताना दिसते आहे.

अमुक तमुक क्रेडिट कार्ड वापरले तर १५ टक्के सूट, २० टक्के सूट या ऑफर्स मधून ही क्रेडिट कार्ड घेण्याची गरज निर्माण होते. आजचा तरुण खूप सहज क्रेडिट कार्डवर आय फोन घेतो, भारीतल्या गाड्या घेतो. पण जर हे कर्ज ते वेळेवर फेडू शकले नाही तर त्यांना महिन्याला तीन टक्के व्याज हे क्रेडिट कार्डवर भरावं लागतं आणि हे चक्रवाढ व्याज असतं.

तुम्ही जर हे कर्ज फेडू शकला नाहीत तर सर्वाधिक फायदा या कंपन्यांना ऑटो. त्यामुळे माझ्या मते हे अभिमन्यूचे चक्र आहे ज्यात सहज जाता येतं पण यातून बाहेर येण्याचा मार्ग अनेकांना ठाऊकच नाही, असं पोफळेंचं म्हणणं आहे.

young people taking loan
Loan On Mutual Funds: कर्ज घ्या पण स्मार्टरीत्या! म्युच्युअल फंडवरही मिळते कर्ज, असे आहेत फायदे

तरुण पिढीचं आयुष्य टी २० सारखं..

आजच्या तरुण पिढीला कमावण्याआधीच खर्च कसा करावा याची प्रलोभन दिली गेली आहेत. त्यातून त्यांची खर्च करण्याची निकड वाढली असून त्यांना सगळं इन्स्टंट मिळविण्याची सवय झाली आहे. त्यांचं आयुष्य हे टी २० मॅच सारखं झालं आहे. त्यांचे उत्पन्न आणि त्यांचा लाईफ स्टाईल वरील खर्च याचा मेळ बसण्यासाठी कर्ज घेऊन खर्च करण्यास सुरुवात झाली. गरज गाडीची असताना बुलेट घेतली जाऊ लागली आहे. स्टेटस सिम्बॉलच्या नादात गरजेपेक्षा जास्त घेण्याची सवय लागली असल्याचे पोफळे यांनी सांगितले.

young people taking loan
Home Loan चे विविध प्रकार तुम्हाला माहित आहेत का? हे गृहकर्ज ठरू शकतं फायदेशीर

दूरदृष्टी कमी झाली आहे..

पोफळे म्हणतात.. अमेरिकन पद्धत आपल्याकडे आली आहे. अमेरिकेत अनेक जण अनेक गोष्टी क्रेडिटवरच घेतात. पण तिथली अर्थव्यवथा अनेक सोयीसुविधा देते. तुम्ही बेरोजगार असाल तर, तुम्ही म्हातारे झालात की सुविधा देते. भारतीय अर्थव्यवथा ही बचतीच्या आधारावर उभी आहे. त्यामुळे बचत करूनच खर्च हा आपला पाय आहे. मागच्या पिढ्यांचा अभ्यास केला तर आपले वाडवडील निवृत्तीच्या पैश्यातून घर घ्यायचे. गरजेच्या वस्तूंसाठीच कर्ज घ्यायचे. आधी कमवायचे आणि मग खर्च करायचे. आता त्याच्या उलट परिस्थिती आहे. खर्च केल्यानंतर तो खर्च भरून काढण्यासाठी कमावले जाते..

खर्चाचे नियोजन आवश्यक

आजच्या तरुण पिढीचं मत हेच आहे की मग या वस्तूंचा उपभोग म्हातारपणी घ्यायचा का? त्यावर पोफळे म्हणतात, येणाऱ्या उत्पन्नाचं नीट नियोजन केलं तर म्हातारपण येण्याआधीही आवश्यक वस्तू घेणं शक्य आहे. फक्त उत्पन्न आणि खर्चाचं नीट नियोजन करणे आवश्यक आहे. गरजेच्या आणि आवश्यक वस्तू कोणत्या? पैसे साठवून घ्यायच्या वस्तू कोणत्या आणि कर्जाऊ घेण्याच्या वस्तू कोणत्या? कोणत्या वस्तूंची गरज सर्वाधी आहे त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. नोकरीची शाश्वती आहे का, याचाही विचार करा. पगार, खर्च आणि कर्ज याचे नियोजन केले तर म्हातारे होण्यापर्यंत वाट पाहण्याची गरज पडणार नाही.

*****

young people taking loan
Credit Card Payment : Credit Card वर लोकांनी 1.4 लाख कोटी रुपयांचा ब्रेड अन् बिस्कीटच खाल्ली, RBI चा धक्कादायक अहवाल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.