Money And Mind
Money And MindEsakal

Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!

श्रीमंतीसाठी पैसा/बँक बँलन्स Bank Balance एवढाच मापदंड असावा का? या बाबतीत फक्त संख्यात्मक विचार न करता गुणात्मक विचार करणे देखील आवश्यक आहे
Published on

आज ‘पैसा हाच देव’ अशी आजूबाजूला परिस्थिती दिसत आहे. प्रत्येक आनंद, सुख-दु:ख, यश-अपयश हे कुठेतरी पैशात मोजण्याची सवय आपल्याला लागली आहे. एखादी व्यक्ती खूप श्रीमंत Rich आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तिच्याकडे पैसा-मालमत्ता Property किती यावरूनच तिचे एकूण मूल्यांकन केले जाते. Money And Mind Tips in Marathi One should be rich by soul also

पण इथे एक निराशाजनक बाब अशी वाटते, की श्रीमंतीसाठी पैसा/बँक बँलन्स Bank Balance एवढाच मापदंड असावा का? या बाबतीत फक्त संख्यात्मक विचार न करता गुणात्मक विचार करणे देखील आवश्यक आहे.

पैसा हे साधन; साध्य नाही!

अगदी मुळात ‘मनी’ची अर्थशास्त्रीय व्याख्या बघायची झाली, तर ती म्हणजे Money is a commodity accepted by general consent as a medium of economic exchange. आज जगात वावरत असताना आपल्याला अनेक वस्तू अथवा सेवा Services यांची गरज भासते. पूर्वी विनिमय हा बलुतेदार पद्धतीने चालत असे. थोडक्यात, आपण तयार करत असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन त्याच्याकडून आपल्याला आवश्यक असणारी वस्तू घेणे.

परंतु, जसा काळ बदलत गेला, तसा पैसा हे विनिमयाचे Exchange साधन बनले. काळाचा महिमा असा, की पैसा हे साधन आहे; साध्य नाही, हेच लोक विसरायला लागले. लहान मुलांना आशीर्वाद देऊन मोठा हो, खूप शिक म्हणतात. परंतु त्यातला गर्भितार्थ एकच असतो तो म्हणजे, का शिक, तर रग्गड पगाराची नोकरी तुला लागावी आणि भरपूर सुखाची साधने त्या पैशातून तू खरेदी करावीस, मग व्यवहारात असा माणूस श्रीमंत व आदर्श समजला जातो.

Loading content, please wait...