सोनेरी सरक्षित गुंतवणूक - गोल्ड सॉव्हरिन बाँड आणि गोल्ड इटीएफ

सोनेरी सरक्षित गुंतवणूक - गोल्ड सॉव्हरिन बाँड आणि गोल्ड इटीएफ

Published on

भारतीय जनतेचे सोन्यावरील प्रेम कमी होऊ शकत नाही. आवश्यक तेव्हा सोने विकून ताबडतोब पैसे उभे करता येतील म्हणजे या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात तरलता असल्याने सर्वसामान्य माणूस सोने खरेदी करीत असतो. पण आता फिजिकल सोन्याला डिजिटल स्वरूपातील सोन्याचे चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. सॉव्हरिन गोल्ड बाँड आणि गोल्ड इटीएफ यांच्या माध्यमातून आपण सोन्यात गुंतवणूक करू शकतो आणि सोन्यातील भाववाढीचा लाभ उठवू शकतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे विनाजोखीम सांभाळणे सहजशक्य आहे, हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी समजून घ्यायला हवे.

सरकारी सॉव्हरिन गोल्ड बाँड घेतल्यास त्यावर वार्षिक २.५० टक्के परतावा मिळू शकतो. शिवाय भविष्यात सोन्याची भाववाढ झाल्यास त्याचाही लाभ मिळू शकतो. आपल्या डिमॅट खात्याच्या माध्यमातून आपण गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. आथा या दोन्ही योजनांविषयी सविस्तर माहिती घेऊया.

सोनेरी सरक्षित गुंतवणूक - गोल्ड सॉव्हरिन बाँड आणि गोल्ड इटीएफ
कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता केव्हा निर्माण होते?

सॉव्हरिन गोल्ड बाँड

काही दशकांपूर्वी सोन्याचे बार आणि दागिने हे सोने खरेदीचे दोनच लोकप्रिय पर्याय होते. परंतु, कालानुरूप इतरही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात गुंतवणूकदार सोने प्रत्यक्षात धारण करण्याची गरज न पडता सहजपणे सोन्यात गुंतवणूक करू शकतात. यातील एक पर्याय म्हणजे सार्वभौम गोल्ड बाँड. फिजिकल सोन्याला पर्याय आणि त्याची आयात कमी व्हावी, या उद्देशाने सरकारने गेल्या काही वर्षांत सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात सॉव्हरिन गोल्ड बाँड बाजारात आणले आहेत. काय असतात हे बाँड, त्याचे फायदे-तोटे काय आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ते घ्यावेत का, हे पाहूया.

आधी उल्लेख केल्यानुसार, या बाँडवर वर्षाला २.५ टक्के व्याज मिळते, जे दर सहा महिन्यांनी दिले जाते. व्याजाला सरकारची हमी असते. कमीतकमी गुंतवणूक रक्कम एक ग्रॅम सोन्याच्या किमतीइतकी असेल आणि कमाल गुंतवणूक ही चार किलो सोन्याच्या किमती इतकीच करता येते. यामध्ये ९९९ शुद्ध सोन्याच्या किमती विचारात घेतल्या जातात. योजना सुरु होण्यापूर्वीच्या तीन दिवसांच्या सोन्याच्या सरासरी किमतीएवढी किंमत ठरविली जाते. या योजनेमधील गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते अनिवार्य नाही, ते वैकल्पिक आहे. बाँडची मुदत जरी आठ वर्षांची असली तरीही, पाच वर्षानंतर ते विकता येतात. पैसे परत करतांना, त्या तारखेच्या आधी तीन दिवस सोन्याची जी सरासरी किंमत असेल, ती किंमत तुम्हाला देण्यात येते. कोठेही प्रत्यक्ष सोन्याची देवघेव होत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एका आर्थिक वर्षात विविध टप्प्यांमध्ये ते जारी केले जातात. हे बाँड बॅंका, पोस्ट ऑफिस, बीएसई, एनएसई, तसेच आरबीआय रिटेल डायरेक्ट पोर्टल यांवरून सुद्धा विकत घेता येऊ शकतात.

गोल्ड बाँडचे फायदे काय आहेत, यावर एक नजर टाकूया.

१) प्रत्यक्ष सोने न घेता सोन्यामध्ये गुंतवणूक. त्यामुळे लॉकरचा खर्च नाही. शुद्धतेमध्ये फसण्याची; तसेच चोरीची भीती नाही.

२) या बाँडसाठी डिमॅट खाते लागत नाही.

३) दर वर्षी २.५ टक्के व्याज मिळण्याची हमी.

४) बाँड बँकेकडे तारण ठेऊन कर्ज मिळू शकते.

५) योजनेची मुदत संपल्यानंतर (८ वर्षांनी) पैसे परत घेतले तर संपूर्ण रक्कम करमुक्त.

तोटे काय असू शकतात, ते पाहू.

१) सर्वांत मोठी जोखीम म्हणजे, व्याजाची जरी हमी असली तरी मुद्दलाची कोणतीही खात्री नसते. सोन्याच्या भावांमध्ये चढ-उतार होत असतात.

२) वार्षिक व्याज करपात्र आहे.

३) लॉक इन पिरियड पाच वर्षे. पाच वर्षांपर्यंत पैसे काढता येत नाहीत.

Loading content, please wait...