प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
अर्थसंकल्पातील नवी कररचना, त्यातील सवलती याबाबत काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे करदात्यांसमोर आपल्याला जुनी की नवी कररचना अधिक लाभदायी ठरेल, त्यापैकी योग्य कररचना कशी निवडावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी दोन्ही कररचनांचे तुलनात्मक विश्लेषण करून निवड सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
भारत सरकारने (Government of India) एक एप्रिल २०२० पासून व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी नवी पर्यायी करप्रणाली सुरू केली. त्यात ‘कलम ११५ बीएसी’ अंतर्गत निर्दिष्ट कर कपात किंवा सवलतींवर कमी केलेले दर निर्धारित केले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रणालीला चालना देण्यासाठी, सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या करप्रणालीमध्ये किमान करपात्र मर्यादा आता तीन लाख रुपये करण्यात आली आहे. (New Tax Regime announced by Finance Minister Nirmala Sitaraman in Union Budget)
(जुनी प्रणाली अडीच, तीन व पाच लाख), तर सात लाखांपर्यंत कमावलेल्या उत्पन्नावरील करसवलत, (जुन्या प्रणालीसाठी पाच लाख) ‘कलम ८७ए’ अंतर्गत बहाल करण्यात आली आहे. फक्त नव्या करप्रणालीत पाच कोटी रुपयांच्यावर उत्पन्न असणाऱ्या करदात्यांचा अधिभार ३७ टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आली आहे. जुन्या करप्रणालीमध्ये ‘कलम ८०’ व इतर कलमांखाली (कलम १६, २४ आदी) मध्ये मिळणाऱ्या वजावटी, ‘कलम १०’ मधील करसवलती मिळू शकतात.