करोनाकाळ उलटून गेला तरी त्याचा प्रभाव पूर्णपणे संपलेला नाही. या काळात अनेक उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडले. अनेकांच्या नोकऱ्या मिळाल्या. अनेकांच्या व्यवसाय थांबले, संपले अथवा होते त्यापेक्षा त्यातील उलाढाल कमी झाली.
कॉर्पोरेट क्षेत्रातही या काळाने अनेक बदल केले. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुळली. पण मग कर्मचाऱ्यांना ऑफिसात आणण्यासाठी एचआरने कंबर कसावी लागली.
या सगळ्याच्या निमित्ताने Bare Minimum Monday, Moonlighting , Quiet Quitting, Quiet Hiring, Quiet Firing, Rage Applying, Resenteeism असले अनेक अनोळखी शब्द आता आपल्या ओळखीचे झाले आहेत. आता त्यात आणखी एक भर पडलीय ती म्हणजे क्वाएट कटिंग या शब्दाची. काय आहे, याचा अर्थ?
Quite Cutting म्हणजे नोकरीवरुन काढून टाकणे आहे, जबरदस्तीने राजीनामा घेणे की आणखी काही?
समजून घेऊया.