कर वाचवा आणि उत्पन्नही वाढवा!

How to Save Taxes & Increase Income
How to Save Taxes & Increase Income
Updated on

या आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही सुरू झाली आहे. त्यामुळे प्राप्तिकर बचतीसाठी गुंतवणूक करण्याबाबत अनेकांची लगबग चालू झाली आहे. त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

प्राप्तिकरात सवलत मिळविण्यासाठी अनेकविध पर्याय आहेत. या कायद्याच्या ‘८० सी’ कलमानुसार कोणताही करदाता जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तिकरात सूट मिळवू शकतो. भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा पॉलिसी, गृहकर्जाची परतफेड आदींसाठी खर्च झालेली रक्कम आदी पर्याय त्यात आहेत (How to Save Taxes & Increase Income). यांखेरीज आणखी एक ठळक आणि लोकप्रिय झालेला प्रकार म्हणजे म्युच्युअल फंडांची ‘ईएलएसएस’(इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम).

जास्त जोखीम, जास्त परतावा!


या योजनेच्या नावातच तिचे सर्वसाधारण स्वरूप स्पष्ट होते. ही गुंतवणूक ‘इक्विटी लिंक्ड’ आहे. याचा अर्थ हा फंड विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे गुंतवतो. हे प्रमाण सुमारे ऐंशी टक्के असते. मुदत ठेवींसारख्या हमखास परतावा देणाऱ्या योजनांप्रमाणे शेअरमधील गुंतवणुकीत परताव्याची हमी नसते. किंबहुना गुंतविलेले मूळ भांडवल सुरक्षित राहील किंवा नाही, हेही सांगता येत नाही. तरी लोक त्याकडे आकर्षित का होतात?.. याचे कारण म्हणजे ‘जास्त जोखीम, जास्त परतावा’ हे या गुंतवणुकीचे अविभाज्य वैशिष्ट्य असते आणि संबंधितांना ते मान्य असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.