Tips to Save Electricity
Tips to Save Electricity

वीजबचतीचे छोटे छोटे फंडे, 'अशी' करा पैशांची बचत!

Published on

कोरोनाचा सर्वाधिक फटका जसा आरोग्यला बसला, तसाच तो उत्पन्नालाही बसला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. काहींच्या पगारात कपात झाली. तर धंदा कमी झाल्याने व्यापाऱ्यांना ही त्याचा फटका बसला. सर्व घटकांना काही ना काही प्रमाणात या महामारीची झळ सोसावी लागली. एकीकडे ही परिस्थीती असताना दुसरीकडे मात्र महागाई वाढतच आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसविताना अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे खर्चात कसाप्रकारे बचत करता येईल, याकडे नागरीकांचा ओढा वाढत चालला आहे. परंतु बचतीचा मार्ग अवलंबताना सर्वसाधारणपणे अनावश्‍यक खर्च बंद करण्याकडे सर्वांचा कल असतो. ते जरी बरोबर असले, तरी त्याचबरोबर अन्य पर्याय देखील असू शकतात. याकडे मात्र आपण फारसे लक्ष देत नाही. त्यामध्ये एक म्हणजे वीजेचा वापर.(Tips to Save Electricity)


वीज बचतीच्या माध्यामातून देखील आपण पैशांची बचत करू शकतो. थोडासा विचार केला, तरी हे शक्य होऊ शकते. कारण दर महिन्याला वीजबिल भरावे लागते. वीजेचे वाढलेले दर आणि वापर यामुळे दर महिन्याला किमान दिड ते दोन हजार रूपये आपला खर्च होतो. जर वीजेचा वापर काळजीपूर्वक केला, तर त्यातून सुद्धा पैशाची बचत करणे शक्य होऊ शकते. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे काळजी घेतली, तरी देखील तुम्हाला हे लक्षात येईल. त्यासाठी फार काही कष्ट करण्याची गरज नाही.सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अन्न, हवा व पाणी यांची जेवढी गरज असते तेवढीच आता विजेची गरज बनलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गातील लॉकडाऊनमुळे घरगुती ग्राहकांना विजेचे महत्व अधिकच अधोरेखित झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून प्रामुख्याने घरगुती ग्राहकांचा वीजवापर बऱ्यापैकी वाढला आहे. घरातूनच कार्यालयीन ऑनलाईन कामे (वर्क फ्रॉम होम), मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु होते व काही प्रमाणात आताही आहे. सर्वच जण घरात असल्याने साहजिकच मनोरंजनासाठी दूरचित्रवाणीसह विजेवरील इतर विविध उपकरणांचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे वीजबिलाच्या रकमेत वापराप्रमाणे वाढ होत आहे. सध्या दैनंदिनमधील बहुतांश कामे ही विजेवरच अवलंबून आहेत व त्यासाठी वीजवापर करावाच लागतो. परंतु अशा स्थितीत वीजबचतीचे काही साधारण उपाय केले तरी साहजिकच विजेची अन् पैशाचीही बचत होते.(How to Reduce Power Bill)

Loading content, please wait...