Should I invest in National Pension System What are the benefits
Should I invest in National Pension System What are the benefits

NPSमध्ये गुंंतवणूक करावी का? काय आहेत फायदे, जाणून घ्या

Published on

निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी या उद्देशाने नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरचा आधार स्वतःच तयार करण्यासाठी; तसेच करसवलतीचा अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी ती उपयुक्त आहे. या योजनेचा तुम्ही अजूनही विचार केला नसेल, तर तो आताच करायला हवा.

आपल्या देशात सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रस्थापित व्यवस्था नसल्याने स्वतःच्या भविष्याची तरतूद स्वतःलाच करावी लागते. नव्या युगात सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा आधार तुटलेला आहे. त्यामुळे तरुण वयापासूनच काही रक्कम टप्प्याटप्प्याने बाजूला ठेवून निवृत्तीनंतरची तरतूद आपली आपणच करणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही एक ऐच्छिक योजना सुरू केलेली असून, तिचा फारसा प्रसार झालेला नाही. या योजनेचा उद्देश चांगला असूनही ती म्हणावी तितक्‍या प्रमाणात लोकांपर्यंत पोचलेली नाही.
नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्यास एक विशिष्ट वयानंतर (६० ते ६५ नंतर) आपल्या नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त व्हावे लागते. व्यावसायिकास वयाचे बंधन नसले तरी शारीरिक क्षमता विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा लागतो. आपण जेव्हा निवृत्त होतो, त्यानंतर आपल्याला मिळणारे नियमित उत्पन्न थांबणार असते; मात्र खर्च थांबणार नसतो. तो काही प्रमाणात कमी होत असला तरी या वयात वैद्यकीय खर्च वाढण्याची शक्यता असते. तसेच वाढत्या वैद्यकीय सुविधांमुळे निवृत्तीनंतरचे आयुर्मान वाढत असल्याचे दिसून येत आहे. निवृत्त होताना जर संबंधित व्यक्तीकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य पेन्शन नसल्याने खडतर होऊ शकते. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षितता (सोशल सिक्युरिटी) विचारता घेऊन २००४ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम अर्थात ‘एनपीएस’ योजना लागू केलेली आहे. लोकांना निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()