पुणे : गुंठेवारी कायद्यातंर्गत घरे नियमितीकरणास मुदत वाढ आणि त्यासाठी आकरावयाचे शुल्क निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात गुंठेवारीची घरे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे गुंठेवारीची घरे नियमितीकरणाची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाले आहे. तुम्ही एक, सव्वा अथवा दोन ते तीन गुंठे जागा घेऊन विना परवाना घरे बांधले आहे. ते तुम्हाला या कायद्यातंर्गत नियमित करून म्हणजे कायदेशीर करून घ्यावयाचे आहे. त्यासाठी किती शुल्क भरावे लागणार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्यांची माहिती तुम्हाला हवी असेल, तर मग हे वाचा.