आयटीमध्ये नोकरी करायचीये काय केले पाहिजे?
- अमोल अवचिते
आजच्या अधुनिक जगात तंत्रज्ञानाला महत्व अधिक आहे. जस जसे आपण पुढे जात राहू. तसे हे क्षेत्र वाढतच जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हा एक देखील आता रोजच्या जगण्याच्या एक भागच झाला आहे. याला सोडून आपला दैनंदिन व्यवहार करणे देखील कठीण होऊ शकते. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
आपल्या आजूबाजूला जीवनमान सुलभ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयटी पसरले आहे. जसे हे तंत्रज्ञान आपले एक जीवनाचा भाग बनला आहे. तसाच तो रोजगार देखील मोठ्या प्रमाणात देऊ लागला आहे. हे आता जगमान्य आहे. परंतू यामध्ये मराठी मुलांच्या पारंपारिक शिक्षण पध्दतीमुळे तसेच विशिष्ट भाषेच्या न्यूनगंडामुळे या क्षेत्रातील नोकरीकडे हव्या तेवढया महत्वकांक्षेने पाहिले जात नाही. असे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ञांचे आहे. आय़टी मध्ये फक्त इंजिनिअरच केले झालेले असावे. असा काही नियम नाही. इतर शाखेतील उमेदवाराला देखील या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची फक्त गरज आहे.