- प्रमोद पुराणिक
गेल्या २३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी बीएसई ऑइल आणि गॅस इंडेक्स २८,३६० अंशांवर बंद झाला होता. या निर्देशांकाने एक वर्षाची भांडवलवृद्धी ६५ टक्के दिली. जेव्हा दोन मुख्य निर्देशांक २३ टक्के आणि २७ टक्के वार्षिक वृद्धी देतात आणि ऑइल व गॅस इंडेक्स ६५ टक्के भांडवलवृद्धी देतो तेव्हा या निर्देशांकाची मागील तीन वर्षांची आकडेवारी बघायलाच हवी.