प्रसाद घारे:
अलीकडच्या काळात ‘सायबर गुन्हेगारी’ हा शब्द सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. मोबाईलवर अनोळखी लोकांकडून येणारे संदेश, लिंक, क्यूआर कोड स्कॅन करायला लावणे आणि त्याद्वारे बँक खाते ‘हॅक’ करून, आर्थिक फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी ‘एथिकल हॅकर’ची मदत घेतली जाते. चांगल्या कामासाठी हॅकिंग तंत्राचा वापर केला जात असल्याने त्याला ‘एथिकल हॅकिंग’ म्हटले जाते, तर हे काम करणाऱ्या तज्ज्ञांना ‘एथिकल हॅकर’ म्हटले जाते. ‘एथिकल हॅकिंग’ क्षेत्रात काम करणाऱ्या दोन तरुण उद्योजकांची ही यशोगाथा...